- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात कारने रस्ता ओलांडत असणाऱ्या बिबट्यास जोरदार धडक दिल्याने धडकेत गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री चेक पोस्ट परिसरात काल शनिवारच्या पहाटे ६ वाजताच्या सुमारास घडली.
माहितीनुसार,पहाटेच्या सुमारास नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ वरील कांद्री चेक पोस्ट परिसरात बिबट्या रस्ता ओलांडत असतांना तितक्याच अज्ञात कार भरधाव वेगाने आली.कार आणि बिबट्या समोरासमोर रस्त्यावर आल्याने कारने बिबट्याला जोरदार धडक दिली.दिलेली धडक इतकी जोरदार होती की,बिबट रस्त्याच्या कडेला दूरवर फेकल्या गेला.घटनेत अज्ञात कारचेही नुकसान झाले असल्याचे कारच्या पडलेल्या अवशेषावरून दिसून आले.धडक जोरदार बसल्याने बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळावरच बराच काळ पडून होता. घटनेची माहिती परिसरात कळताच बघ्यांनी मोठी गर्दी केली.दरम्यान,ओरिएंटल टोल प्लाझा टीम व वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला.मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून वनविभागाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले.
- Advertisement -

