- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-एका अज्ञात इसमाने चक्क रेल्वे डब्ब्याच्या शौचालयात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना काल शनिवारी दुपारच्या सुमारास बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये उघडकीस आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.११००१ क्रमांकाची नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वे गाडी ही मुंबईहून दुपारी दीडच्या सुमारास बल्लारशाह रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पाचवर थांबली. नेहमी प्रमाणे रेल्वेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गाडीतील सफाई करण्यास सुरुवात केली. अश्यातच सफाई कर्मचाऱ्यांनी नंदीग्राम एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक ३ मधील शौचालयाचे दार उघडण्याचा प्रयत्न केला असता,शौचालयाचे दार आतून बंद असल्याचे आढळून आले.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दार ठोठावून आवाज दिला.बराच वेळ आवाज देऊनही कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी स्टेशन प्रबंधक व रेल्वे जीआरपी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार जीआरपीचे अरविंद शाह व पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनीही दार थाठवून आवाज दिला,मात्र प्रतिसाद न मिळाल्याने शौचालयाचे दार तोडले.आतमध्ये एका इसमाने कपड्याच्या साहाय्याने टाकीच्या पाइपाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. प्रकरणी मृतदेह खाली उतरवून रेल्वे डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.गळफास घेतलेल्या अज्ञात इसमाची अद्याप ओळख पटलेली नसून त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
- Advertisement -

