Wednesday, July 15, 2026
Homeमुंबईअजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत तर्कवितर्क न लावता,सखोल चौकशी होऊ द्यावी- मुख्यमंत्री फडणवीस

अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत तर्कवितर्क न लावता,सखोल चौकशी होऊ द्यावी- मुख्यमंत्री फडणवीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-नुकतेच अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या संशयावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत म्हणाले की,रोहित पवार यांनी काय वक्तव्य केले,हे मी थेट ऐकले नसले तरी त्यांनी काही प्रेझेंटेशन केले असल्याची माहिती आहे.विविध माध्यमे व नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकाच त्यांनी मांडल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.अजित पवार हे महाराष्ट्राचे लाडके व वरिष्ठ नेतृत्व होते.त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण,सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे,ही मागणी रास्त असून अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत तर्कवितर्क न लढवता,सखोल चौकशी पूर्ण होऊ द्यावी.कोणीही या दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नये,या अपघाताबाबत कोणाकडे काही पुरावे किंवा मुद्दे असतील,तर त्यांनी ते संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत,असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज,बुधवार ११ जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधतांना व्यक्त केले.चौकशी पूर्ण होण्यापूर्वी तर्कवितर्क मांडल्यास लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो,असे सांगत त्यांनी भारतीय तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवू नये,असे आवाहन केले.मीच सर्वप्रथम केंद्र सरकारला पत्र लिहून योग्य चौकशीची मागणी केली होती.केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी समिती स्थापन केल्याचे पत्रही पाठवले असून सध्या तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.देशातील डीजी एव्हिएशन सेफ्टी हे सर्वोच्च कार्यालय असून आतापर्यंतच्या सर्व विमान अपघातांची चौकशी त्यांनीच केली आहे. याशिवाय,सीआयडीचा समांतर तपास सुरू असून डीजीसीएचीही चौकशी सुरू आहे.अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स सापडला आहे.शिवाय विमानाचे आवश्यक भाग जप्त करण्यात आले असून पायलट व एटीसीमधील संवाद डिजिटाईज स्वरूपात उपलब्ध आहे. अपघातस्थळावरील नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत,अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन  बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना...

मधमाशी पालन केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मधाला हमीभावाची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शेतकरी व युवकांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 'मध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!