Saturday, September 5, 2026
Homeनागपूर'नो रिस्क' म्हणत चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच नेली चोरून...

‘नो रिस्क’ म्हणत चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच नेली चोरून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आपण अनेकदा विविध चोऱ्या होतांना बघितले असेलच,पण ज्यावेळी चोरीचा प्रयत्न निष्फळ ठरतो,अश्यावेळी ‘नो रिस्क’ म्हणत चोरटे शॉर्टकट मार्गाचा अवलंब करीत असतात.असाच काहीसा प्रकार नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यात काल ५ मार्चला उघडकीस आला.चोरट्यांनी आव-डाव पाहून पैश्यासाठी चक्क एटीएम मशीनच उचलून नेली.प्रकरणी मशीन चोरतांना तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.सदरची घटना सावनेर तालुक्याच्या खापरखेडा-पारशिवनी मार्गावरील भानेगाव टी पॉइंटजवळ घडली.
नीलेश प्रभू राऊत वय ३८ वर्षे,रा. वर्ड क्रमांक-४, नवीन भानेगाव,ता.सावनेर यांचे भानेगाव टी पॉइंटजवळ राऊत कॉम्प्लेक्स नावाने इमारत आहे. या इमारतीत तीन दुकाने असून,कॉम्प्लेक्स समोर वाकरंगी कंपनीची ‘एटीएम मशीन’ आहे.या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्यार एटीएमच्या खोलीत दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.मंगळवारी ४ मध्यरात्री १:३० वाजताच्या सुमारास खोलीत एटीएम मशिन असल्याचे काहींनी बघितले. नंतर २ वाजताच्या दरम्यान पारशिवनीहून आलेले पांढऱ्या रंगाचे टाटा मॅक्स हे वाहन राऊत कॉम्प्लेक्सजवळ थांबले.त्यातील तिघे मशीनजवळ आले,तर चौथा वाहनात बसून होता.सुरुवातीला त्यांनी एटीएम रूम व बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंग फासला. कोपऱ्यातील कॅमेरा बंद करण्यासाठी वायर कापला. तो वायर वीजपुरवठ्याचा असल्याने चोरटे व त्यांनी केलेला उपद्व्याप कॅमेऱ्यात कैद झाला.या मार्गावर २४ तास वाहनांची रहदारी असते.तीनही चोरट्यांनी योग्य वेळ साधून अख्खी एटीएम मशीन उचलून वाहनात ठेवली आणि पारशिवनीच्या दिशेने पळून गेले.नीलेश राऊत मॉर्निंग वॉकला जात असतांना,त्यांना हा प्रकार लक्षात आला.त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली.याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.खापरखेडा पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखा व पारशिवनी पोलिस समांतर तपास करीत आहेत.
नीलेश राऊत यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये वाकरंगी कंपनीकडून एटीएम मशीनची एजन्सी घेतली.त्यांनी मशिनमधील ‘ट्रे’ मध्ये रक्कम भरणे,मशिनची देखभाल व दुरुस्ती करणे ही सेवा कमिशन तत्त्वावर घेतली आहे.मशिनमध्ये मंगळवारी १ लाख ७२ हजार रुपये लोड केले होते.काल बुधवार मध्यरात्रीपर्यंत १ लाख २९ हजार ७०० रुपयांची खातेदारांनी उचल केली. त्यामुळे मशिनमध्ये ४२ हजार ३०० रुपये शिल्लक होते.या मशिनची किंमत २ लाख १० हजार रुपये असून,चोरट्यांनी २ लाख ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!