Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरअजब-गजब कारनामा…! वारंवार वीजपुरवठा खंडित; सरपंचाच्या लागली जिव्हारी अन् चक्क वीज कर्मचाऱ्याला...

अजब-गजब कारनामा…! वारंवार वीजपुरवठा खंडित; सरपंचाच्या लागली जिव्हारी अन् चक्क वीज कर्मचाऱ्याला बांधले खांबाला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

घुग्घुस(चंद्रपूर) :- वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले.ही बाब सरपंचाच्या जिव्हारी लागली आणि चक्क सरपंचाने वीज कर्मचाऱ्याला गावातील वीज खांबाला बांधले.एवढेच नाही तर अश्लील शिवीगाळ तसेच मारण्याची धमकी दिली.ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस जवळील नकोडा गावात शनिवारी घडली.याप्रकरणी वीज कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून सरपंच किरण बांदूरकर यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, गुन्हा दाखल होताच सरपंच फरार आहे.

मागील चार वर्षांपासून वीज कर्मचारी सूरज परचाके हे नकोडा व उसगाव येथे लाईनमन म्हणून कार्यरत आहे.दोन्ही गावासाठी एकच लाईनमन आहे.गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याबरोबर अनेक तक्रारी असतात.त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.शनिवारी दुपारी उसगाव येथे वीज कर्मचारी परचाके जात असताना नकोडा येथील सरपंच किरण बांदूरकर तसेच अन्य दोघांनी रस्त्यात अडवून त्यांना नकोडा येथे आणले.त्यानंतर एका वीज खांबाला बांधून अश्लील शिवीगाळ केली.यावेळी मारण्याची धमकी दिली.दरम्यान, याचवेळी पोलिसांची गस्त असल्याचे लक्षात येताच वीज कर्मचाऱ्याला सोडून देण्यात आले. माहिती होताच स्थानिक वितरण कार्यालयातील सहायक अभियंता नयन भटारकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह गावात पोहोचले.त्यानंतर सरपंच बांदूरकर यांच्याविरुद्ध घुग्घुस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.तक्रार दाखल होताच पोलिसांनी बांदूरकरसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला.मात्र, घटनेनंतर सरपंच बांदूरकर फरार असून,पोलिसांनी दोन पथके तयार करून शोध सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!