Tuesday, June 23, 2026
Homeआरमोरीयुवतीचा विनयभंग; वैरागडच्या माजी तंटामुक्ती अध्यक्षावर गुन्हा दाखल…-आरमोरी तालुक्यातील घटना…

युवतीचा विनयभंग; वैरागडच्या माजी तंटामुक्ती अध्यक्षावर गुन्हा दाखल…-आरमोरी तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :- आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथील माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष खुशाल हरी सावरकर वय ६२ वर्षे, रा.कुंभार मोहल्ला याने वैरागड येथील घराशेजारी भांडी घासत असणाऱ्या युवतीला अश्लील इशारे करून विनयभंग केल्याची घटना शुक्रवार,१४ जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली असून माजी तंटामुक्ती समिती अध्यक्षासआरमोरी पोलिसांनी १५ जून रोजी अटक केली.

सविस्तर वृत्त असे की,वैरागड येथील पीडित युवती ही शुक्रवार,१४ जून रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या घराशेजारी भांडी घासत असताना ती एकटीच असल्याचे पाहून आरोपी हा तिच्याजवळ काही अंतरावर गेला.तेथे उभा राहून त्याने पहिल्यांदा युवतीचे लक्ष वेधले.त्यानंतर युवतीला लज्जा वाटेल असे अश्लील इशारे करीत तिचा विनयभंग केला; अशी तोंडी जबानी पीडितेने आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये दिली.त्यानुसार आरोपी खुशाल सावरकर याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला १५ जून रोजी अटक करण्यात आली.त्याला आरमोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटकासुद्धा झाली आहे.विशेष म्हणजे,यापूर्वीही सदर आरोपीने एका महिलेचा विनयभंग केला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!