Friday, June 12, 2026
Homeभंडाराअखेर निलंबित तहसीलदार पूर्वपदावर; महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दिलासा..

अखेर निलंबित तहसीलदार पूर्वपदावर; महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दिलासा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अधिकार नसतानाही अकृषक जमिनीचे परवाने देण्यासह अन्य कारणाहून भंडाऱ्याच्या तहसीलदार विनिता लांजेवार यांना १० ऑक्टोंबर २०२४ रोजी निलंबित करण्यात आले होते.याप्रकरणी लांजेवार यांनी मॅट (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) मध्ये धाव घेत राज्य शासनाच्या आदेशाविरुद्ध दाद मागितली होती.यात मॅटमध्ये लांजेवार यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य नसल्याचे समोर आले.मॅटने त्यांना दिलासा देत पुढील आदेशापर्यंत निलंबन आदेशावर स्थगिती’ देत भंडाऱ्याच्या तहसीलदार पदी रुजू होण्याचे आदेश दिले.कोणताही दंड न आकारता वाळूचे ट्रक सोडणे बेकायदेशीर कामे करणे,अशा आरोपांसह आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तहसीलदार लांजेवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.यासंदर्भात महसूल वनविभागाने त्यांना चौकशीवरून निलंबित केले होते.यावर लांजेवार यांनी मॅटमध्ये दाद मागितली होती.त्यांनी दिलेल्या उत्तरादाखल,तहसीलदार भंडारा म्हणून लांजेवार यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे.
अवैध वाहतुकीतून त्यांनी ८१ लाख रुपये वसूल करीत राज्य शासनाला महसूल मिळवून दिला आहे.तसेच त्यांनी अन्य प्रकरणांत जमिनीचा कर आकारला असल्याचा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांचा उपलब्ध आहे.सबब त्यांच्यावरील आरोपात अजिबात तथ्य नसल्याचा निर्वाळा मॅटने दिला.तसेच त्यांना भंडाऱ्याच्या तहसीलदारपदी रुजू होण्याचे आदेश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!