Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरअखेर कैदी हर्ष रामटेके दोन दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात.. - दवाखान्यातून मध्यरात्री केले...

अखेर कैदी हर्ष रामटेके दोन दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात.. – दवाखान्यातून मध्यरात्री केले होते पलायन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात घरफोडी व इतर सहा गुन्ह्यंतर्गत शिक्षा भोगत असलेला भंडारा येथील रहिवासी २३ वर्षीय कैदी हर्ष महेंद्र रामटेके अखेर दोन दिवसांनी पोलिसांच्या हाती लागला आहे.
नागपूर मेडिकलमध्ये उपचार सुरू असतांना शनिवारच्या मध्यरात्री त्याने मेडिकलमधून पलायन केले होते.प्रकृती बिघडल्याने रामटेकेला मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक-३६ मध्ये दाखल करण्यात आले होते.शनिवारी १७ मे २०२५ रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास त्याने पलायन केले. सीसीटीव्ही फुटेज बघितल्याने सदर प्रकरण पुढे आले होते.त्याने काळे पट्टे असलेला चमकदार गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातलेला होता.अश्यातच सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली होती. पळून जाण्याच्या वेळी एक गार्ड खुर्चीवर बसलेला होता.त्याने आरोपीला अडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता.मुख्य दरवाजा उघडतांना रामटेके अडखळला होता.नंतर जोरात दरवाजा खीचल्याने तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता.सदरची घटना नागपूर शहरात वाऱ्यासारखी पसरली होती व घटनेबाबत व्हिडिओ व्हायरल होताच  कारागृह,मेडिकल रुग्णालय आणि पोलिस यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानुसार पोलिसांचे दोन पथक त्याच्या मागावर होते. अखेर आज,सोमवार १९ मे रोजी कैदी हर्ष रामटेके याला पकडण्यात नागपूरच्या अंजनी पोलिसांना यश आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!