Sunday, September 6, 2026
Homeगोंदियाअखेर इटियाडोह धरणाच्या कालव्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला..

अखेर इटियाडोह धरणाच्या कालव्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील
 कन्नडगाव-वडेगाव स्टेशन येथील १४ वर्षीय मुलगा मित्रांसोबत शुक्रवारी गावालगत असलेल्या इटियाडोह धरणाच्या कालव्यात आंघोळीसाठी गेले गेले असता, आंघोळ करतांना आर्यन प्रमोद शहारे हा पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहून गेला होता.आर्यन वाहून गेल्याची माहिती त्याच्या सहकारी मित्रांनी घरच्यांना दिली होती.त्यानुसार अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तसेच ग्रामस्थांनी घटनेच्या दिवशीच शोधमोहीम राबवली. मात्र,अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल,शनिवारी इटियाडोह धरणाच्या कालव्यात शोधमोहीम राबवली असता आर्यनचा मृतदेह वडेगावपासून ३९ किलोमिटर अंतरावर आढळून आला.आर्यनचा मृतदेह आढळताच त्याच्या आई-वडिलांनी घटनास्थळी एकच टाहो फोडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!