- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार विदर्भातील अनेक जिल्ह्यात कुठे हाय अलर्ट तर कुठे यलो अलर्ट जारी करण्यात आला व वादळी वारे,गारपीट,विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसू लागला.अशातच आज,गुरुवार ३ एप्रिलला भंडारा जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती.त्यातच शेत कामावर गेलेल्या दोन शेतकऱ्यांच्या अंगावर विज कोसळल्याने दोन्ही शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवारी दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी येथे घडली.प्रमोद मनिराम नागपुरे वय ४५ वर्षे,व मनिषा भारत पुष्पतोडे वय २८ वर्षे दोघेही रा.पाथरी, ता.तुमसर असे वीज कोसळून ठार झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
माहितीनुसार,आज सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.पावसाची उघडीप सुरू असल्याने शेतकरी प्रमोद नागपुरे व मनिषा पुष्पतोडे दुपारच्या सुमारास शेतावर गेले होते.शेतात काम करीत असतांना पाऊस बरसु लागला.त्यामुळे दोन्ही शेतकरी पाऊस उघडेपर्यंत शेतालगतच्या झाडाखाली असलेल्या झोपडीत गेले.काहीकाळ झोपडीत असतांना आकाशात विजांच्या कडकडाटासह आवाज होत वीज झाडाखाली असलेल्या झोपडीवर पडली.वीज झोपडीवर कोसळताच दोन्ही शेतकरी जागीच गतप्राण झाले.घटनेची माहिती गावामध्ये पसरताच ग्रामस्थ,पोलीस पाटील, तहसीलदार, तलाठी तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी झाले. काहीकाळ बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.मृतांचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले.सदर घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
- Advertisement -

