- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखाद्या चित्रपटाप्रमाणे राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या स्थितीत सुपरहीट ठरली आहे.आता पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण ७५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.अशातच एका कुटुंबात जर दोन महिला लाभार्थी असतील तर अशांना एकूण १५ हजार रुपये जमा झाल्याने अनेक कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे.काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख मागील महिन्याच्या ३१ सप्टेंबर होती.आता अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.त्यानुसार आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज १५ ऑक्टोंबर पर्यंत भरता येणार आहेत.या योजनेचा लाभ न घेतलेल्या महिला आता अर्ज करु शकणार आहेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांचे अर्ज स्विकारले गेले नाही.दरम्यान,अनेक महिलांना अर्ज करतांना काही समस्या आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अर्ज मान्य झाले नाहीत.त्यामुळेच आता या महिलांना अर्ज करण्यासाठी संधी मिळाली आहे.परंतु सध्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा फक्त अंगणवाडी केंद्रातच भरला जाणार आहे.
- Advertisement -

