Sunday, July 12, 2026
Homeभंडारारेती चोरट्यांचा नवा फंडा; ट्रॉलीत रेती अन् वरती तणसाने झाकून वाहतूक... -महसूल...

रेती चोरट्यांचा नवा फंडा; ट्रॉलीत रेती अन् वरती तणसाने झाकून वाहतूक… -महसूल व पोलिस विभागाची कृपा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-अवैध रेती चोरीसाठी चोरटे नवनवीन तंत्रज्ञान आणि शक्कल लढवीत असल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात उघडकीस आला आहे.तुमसर तालुक्यात सध्या रेतीची अवैध वाहतूक होत नसल्याचे भासत असलेतरी नदी तिरावर वसलेल्या ग्रामीण भागात या उलट चित्र पाहावयास मिळते. रेतीची मागणी व पूर्तता यामुळे सध्या शहरी भागातील बांधकामे ठप्प पडली आहेत.होईल त्या मार्गाने, मिळेल त्या दराने रेतीची मागणी पूर्ण करण्याकरिता माफियांना कमालीची शक्कल लढविली आहे.अवैध रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला चक्क तणसाने झाकून वाहतूक केली जात आहे.शहरात एकाएकी वाढलेली ही वाहतूक सामान्य नागरिक सहज अनुभवत आहेत.त्याची चर्चा देखील केली जात आहे. शहरातील अतिव्यस्त भागातून धावणारी ही वाहतूक प्रमुख ३ पोलिस चौकातून होऊन जाते.मात्र,यापासून पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांची तुमसरची टीम व महसूल विभाग अनभिज्ञ कसे? याचेच मोठे आश्चर्य ! महसूल पोलिस विभाग सोबतीला? सध्या परवानाप्त तामसवाडी व सोंडया या डेपोवरून रेतीची रीतसर वाहतूक सुरू आहे.मात्र,या दोन्ही डेपोची वैधता कालावधी नेमकी किती? तसे असलेतरी स्थानिक स्तरावर ट्रॅक्टरने वैध परवाना असलेल्या रेती वाहतुकी व्यतिरिक्त धावणारी अवैध वाहने महसूल व पोलिस विभागाच्याच आशीर्वादाने मार्गी लावली जात असल्याची चर्चा शहरात जोर धरून आहे.
वैध परवाना असलेली रेती ट्रॅक्टरच्या एक ब्रास क्षमतेनुसार १५०० रुपये रेती,गाडी,हमाल,डिझेल भाडा असे सर्व मार्गाने शहरात ५ हजार २०० ते ३०० दराने गरजूला उपलब्ध करून दिली जात आहे.त्यातही तालुक्यातील ठेकेदारांनी कामबंद केल्याचे चित्र आहे.याचाच नेमका फायदा अवैध वाहतूकदार घेत असल्याचे समजून येते.त्यामुळे वैध-अवैध रेती वाहतूकदार देखील गरजूंची लूट करीत असल्याची माहिती आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!