Monday, May 4, 2026
Homeगोंदियाअन् ३ हजार नाभिकांनी दाढी,कटिंगला हात न लावता केली 'हजामतबंदी'...

अन् ३ हजार नाभिकांनी दाढी,कटिंगला हात न लावता केली ‘हजामतबंदी’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-पूर्वी अनेकजण नाभिकांकडे न जाता घरच्या घरीच दाढी आणि केसांची कटिंग करायचे; काळानुरूप हळूहळू बदल होत गेला आणि लोकं नाभिकांकडे जाऊन दाढी आणि कटिंग करू लागले.आता अनेकांना नाभिकांची सवय जडलेली दिसून येत आहे.अशातच नाभिक बांधवांनी दाढी आणि कटिंगला हातच लावला नाही तर काय होणार?असाच प्रकार गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आला आहे.तब्बल ३ हजार नाभिकांनी दाढी आणि कटिंगला हात न लावता एक दिवसीय  ‘हजामतबंदी’ घातली.

नाभिक समाज हा अल्पसंख्यांक असून; आर्थिक दृष्ट्या मागास आहे.सर्वांना स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी केश कर्तनालयाचा व्यवसाय करतो. तरीपण कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारने समाजाच्या मागण्या मंजूर न केल्यामुळे अखेर ३० सप्टेंबरला गोंदिया जिल्ह्यातील सुमारे ३ हजार सलून दुकाने बंद ठेवण्यात आले.अनेक वर्षांपासून जवळपास सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळींना नाभिक समाजाच्या मागण्यांचे अनेक निवेदने दिली आहेत.यात नाभिक समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास असून,सर्वांना स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी केश कर्तनालयाचा व्यवसाय करीत आहे.त्यामुळे अनुसूचित जातीच्या सवलती मिळण्यासाठी तसेच व्यवसायात भरपूर वाढ होण्यासाठी संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यान्वित करुन,दोनशे कोटींची आर्थिक रुपात तरतूद करणे; अशा विविध मागण्यांचे अनेक निवेदने देण्यात आले आहेत.परंतू,आजपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारकडून मागण्या मंजूर करण्यात आल्या नाहीत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!