Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरआता अदानी समूह चालवणार चंद्रपुरातील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा... -...

आता अदानी समूह चालवणार चंद्रपुरातील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा… – अदानी समूहाकडून आता महाराष्ट्र बाराखडी लिहिणार- अंबादास दानवे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या घुग्घूस शहरातील एसीसी सिमेंट उद्योगामार्फत चालविली जाणारी माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा आता अदानी समूहामार्फत चालविली जाणार आहे.नुकतेच या शाळेचे हस्तांतर अदानी समूहाला करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे.दरम्यान, वर्षभरापूर्वीच एसीसी सिमेंट उद्योग अदानी समूहाला हस्तांतरित झाला आहे. आता विरोधकांनी या निर्णयावरून सरकारवर टीका सुरू केल्याने अदानी समूह पुन्हा चर्चेत आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहरात अनेक वर्षांपासून एसीसीसी सिमेंट उद्योग कार्यरत आहे.या उद्योगातील कामगारांच्या पाल्यांकरिता माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा चालविली जात होती.या शाळेमध्ये कामगारांची मुले शिक्षण घेत असताना आता ही शाळा अदानी फाऊंडेशनकडे शासनाने हस्तांतरित केली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने २७ सप्टेंबरला हस्तांतरासंदर्भात एक शासन निर्णय जाहीर केला आहे.या निर्णयानुसार आता एसीसीऐवजी अदानी समूह माऊंट कार्मेल शाळा चालविणार आहे.
अदानी समूहाकडून आता महाराष्ट्र बाराखडी लिहिणार- अंबादास दानवे👇
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांनी एक्स पोस्टवर जोरदार टीका केली आहे.प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे की,देशाला शिक्षणाचा मार्ग देणाऱ्या महाराष्ट्र सरकारवर आज अदानी समूहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे.जमीन, उद्योग कमी होते; ते आता शाळा देखील महायुतीचे सरकार अदानीच्या ताब्यात देत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!