- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सातव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनींना सहाय्यक शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना काल, शनिवारी २८ सप्टेंबर रोजी घडली.लावण्या कुमदेव चुधरी व धनश्री हरीदास दहेलकार असे मारहाण झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत.मारहाण झाल्यानंतर दोघींनाही उपचारासाठी सावलीचे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सावली तालुक्याच्या व्याहाड खुर्द येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शाळेच्या वेळेवर गेले होते.प्रार्थनेनंतर विद्यार्थी वर्ग खोल्यामध्ये गेले असता,वर्गातील सहाय्यक शिक्षिका उज्ज्वला पाटील यांनी सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावून माझ्या बाटलला हात का लावले? पिण्याच्या पाण्यामध्ये काही टाकले का? अशी शंका व्यक्त करीत वर्गातील विद्यार्थ्यांना मारहाण केली.त्यात लावण्या व धनश्री यांना दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.दोन्ही विद्यार्थिनी शाळेत हुशार असून शालेय मंत्रिमंडळात लावण्या ही मुख्यमंत्री तर धनश्री ही शिक्षणमंत्री आहे.शिक्षिका ही नेहमीच विद्यार्थ्यांना मारहाण करीत असल्याचा आरोप विद्यार्थीनींकडून करण्यात आला आहे.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकवर्गाकडून केल्या जात आहे.
मधुकर वासनिक,गटविकास अधिकारी पंचायत समिती सावली👇या प्रकरणाबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी करुन संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्यात येईल.विद्यार्थ्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता नियमित शाळेत जावे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

