Thursday, October 22, 2026
Homeमुंबईमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी?निवडणूक आयोगाने केले स्पष्ट... - आता गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी?निवडणूक आयोगाने केले स्पष्ट… – आता गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्रात ३ वेळा द्यावी लागणार जाहिरात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई:-आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते.या दौऱ्यानंतर निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांनी आज,२८ सप्टेंबरला पत्रकार परिषदे घेऊन दोन दिवसातील आढाव्याची आणि तयारीची माहिती दिली.आज मुंबईतील ट्रायंडेट हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने पत्रकार परिषद घेत  महाराष्ट्रात निवडणूका कधी होणार यावर भाष्य केले आहे.निवडणुका घेण्यास आयोगाने अजून वेळ मागितला आहे.यामुळे आता निवडणूक अजून लांबणीवर गेली आहे.
राजीव कुमार यांनी सांगितले की,आगामी निवडणुकीची तयारी कशी केली जात आहे हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. ‘आपले मत आपला हक्क’ हा कार्यक्रम सुरू आहे.या दौऱ्यात त्यांनी बसपा,आप,सीपीआय,मनसे,शिवसेना, यूबीटी,मनसे अशा ११ पक्षांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वी सणांची काळजी घ्यावी; असे सर्वांनी मिळून सांगितले आहे.ते म्हणाले की,निवडणुकीची तारीख मध्यभागी असावी,अशी पक्षांची मागणी आहे.२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काही गैरसोयी दिसल्या, मतदारांनी त्यांना सामोरे जाऊ नये.फेक न्यूजच्या प्रसारावर बंदी घालावी.तसेच आम्ही २६ नोव्हेंबर आधी महाराष्ट्रात निवडणुका घेऊ,असे त्यांनी स्पष्ट केले आहे.राजीव कुमार म्हणाले,दोन दिवस राजकीय पक्षांशी चर्चा झाली.सण आणि उत्सवानंतर निवडणुका जाहीर कराव्यात; असे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे.निवडणूक आयोगाने सांगितले की, “आम्ही ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली.काही पक्षांनी पैशाच्या ताकदीवर अंकुश ठेवण्याची विनंती केली. काहींनी मतदान केंद्र दूर असल्याच्या तक्रारी केल्या तर काहींनी वृद्धांसाठी वाहनांची व्यवस्था करण्याची मागणी केली.काही पक्षांनी पोलिंग एजंट एकाच मतदारसंघातील असावा; अशी विनंती केली.मतदान केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्याची मागणीही पक्षांनी केली.तसेच उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही हे जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे; पक्षकारांनाही कळवावे.
यासंदर्भात सर्व पक्षांना गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्रात ३ वेळा जाहिरात द्यावी लागणार आहे.दारू,पैसा अन्य गैरप्रकारांवर राज्यात ३००हून अधिक चेक नाके नजर ठेवतील असेही स्पष्ट करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!