- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील जंगल परिसरात तसेच शेत शिवारात धुमाकूळ घालून चौघांचा बळी घेणारी टी ८३ वाघिणीला चंद्रपूर वनविभागांतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील जानाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक- ७१७ मध्ये आज, शनिवार २८ सप्टेंबर रोजी वन विभागाकडून जेरबंद करण्यात आले.वाघिण जेरबंद झाल्याने तालुक्यातील शेतकरी,शेतमजूरांसह गुराख्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
चंद्रपूर वनविभागातील मुल उपक्षेत्रा अंतर्गत जानाळा, कांतापेठ,चिरोली,कवडपेठ,चिचाळा,ताडाळा परिसरातील मानव-वन्यजीव यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊन शेतकरी शेतमजूर,नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती.मागील काही दिवसांत जंगलालगतच्या शेतशिवारात चौघांचा जीव घेतला होता.त्यामुळे या गावांमध्ये प्रचंड दशहत निर्माण होऊन वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात होती.वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असताना वनविभागाने वाघिणीला जेरबदं करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.त्यानुसार आज शार्प शूटर अजय मराठे यांनी वाघिणीला बेशुध्द केले.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे व त्यांच्या चमुने वाघिणीवर उपचार केले.या वाघिणीने आता पर्यंत जंगलालगतच्या शेतशिवारात काम करणाऱ्या चौघांचा जीव घेतला होता.
- Advertisement -

