- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-रेती चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.रेतीची चोरी रात्री तर केलीच जात आहे; पण,आता दिवसाढवळ्याही बिनधास्तपणे रेतीची चोरी करून वाहतूक केली जात असल्याने चोरांचे साथीदार तयार झाल्याचे चित्र सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.अशातच भंडारा जिल्ह्यातील रेती चोरीवर अंकुश मिळविण्यासाठी महसूल विभागातील यंत्रणा कामी लागली असली तरी चोरटे मात्र अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन कसे पळ काढतात,याचा एक वेगळा नमुना मोहगाव देवी रेती डेपोच्या मार्गावर कर्तव्यावर असणाऱ्या तलाठ्याला आला.
सरस्वता झाडे या मोहाडी तहसिल कार्यालयाअंतर्गत मोहगाव देवी येथे अतिरिक्त प्रभारी तलाठी म्हणून कार्यरत आहेत.मोहगाव देवी डेपोकडे जाणाऱ्या कमानीजवळ २३ सप्टेंबरच्या दुपारी १२:४० वाजताच्या दरम्यान त्यांनी कार्यालयासमोरून रेती घेऊन जाणारा १० चाकी टिप्पर क्रमांक-
एमएच-३६,३४४५ थांबविला आणि चौकशी केली. त्यात २० हजार रुपये किंमतीची सुमारे ५ ब्रॉस रेती भरलेली आढळली.त्यासंदर्भात चौकशी केली असता चालकाकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती.चालक राहूल मडावी याने,आपण मालकाच्या सांगण्यावरुन या रेतीची वाहतूक करीत असल्याचे त्याने सांगितले. या कारवाईदरम्यान टिप्परची चावी आणि कागदपत्रे ताब्यात घेऊन तलाठी चौकशी करीत असतानाच, संबंधित वाहनचालकाने आपल्याजवळी डुप्लिकेट चावी लावून टिप्पर सुरू केला.तो रिव्हर्स घेऊन रेती आणि टिप्परसह पळ काढला.मात्र तलाठी काहीच करू शकले नाही.या प्रकरणी वरठी पोलिसात तलाठ्याने तक्रार नोंदविली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२),२८१,२२१,२६२,२३८,४९ सहकलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisement -

