Tuesday, September 8, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यात युवक काँग्रेसचा "चलो पंचायत, चलो वार्ड"अभियान.. -काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरात...

देसाईगंज तालुक्यात युवक काँग्रेसचा “चलो पंचायत, चलो वार्ड”अभियान.. -काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरात पोहचवण्यासाठी युवक काँग्रेस सक्रिय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देशातील वर्तमान स्थिती बघता बहुजनांचे अधिकार फक्त काँग्रेस पक्षच अबाधित राखु शकते; हा विश्वास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देसाईगंज तालुका युवक काँग्रेसच्या वतिने “चलो पंचायत,चलो वार्ड”अभियान राबविण्यात येणार असून काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरात पोहचवण्यासाठी युवक काँग्रेस सक्रिय झाली आहे.
 या संदर्भात देसाईगंज येथील शासकीय विश्रामगृहात नुकत्याच पार पडलेल्या देसाईगंज तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दरम्यान आवश्यक बाबीची पुर्तता करण्यासंदर्भातही नियोजन करण्यात आले असून तालुक्यात युवक काँग्रेसचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.यावेळी माजी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष लॉरेन्स गेडाम,विधानसभा अध्यक्ष अक्षय भोवते, देसाईगंज तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पंकज चहांदे,आरमोरी विधानसभा काँग्रेस कार्यकर्त्या डॉ.शिलु चिमूरकर,युवक काँग्रेसचे युवा नेता पिंकू बावणे,देसाईगंज नगर परिषदेचे माजी नगरसेवक हरीश मोटवानी,तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष देवनाथ सयाम,मच्छिंद्र मातेरे,अमर भर्रे,तालुका सचिव आक्रोश शेंडे,संघटक राजेंद्र तूपट, कोषाध्यक्ष विजय चंडिकार,शहर उपाध्यक्ष विजय पिल्लेवान,ओमकार कामथे, मनोज दोनाडकर,ओमराज हारगुळे,नरेश जौंजाळकर, आशिष पारधी,रोशन नहाले, विकास पारधी,ज्ञानेश्वर वझाडे, विनोद तोंडफोडे, भूमेश्वर शिंगाडे,सुनील राऊत,मनोज दोनाडकर,अरविंद दुफारे, दिलीप गुरनूले,पुरुषोत्तम मोहुर्ले,अविनाश अनोले, विक्रम राऊत,अक्षय दामले, किरण अवसरे,कुंदन बोदेले आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!