Tuesday, September 8, 2026
Homeदेसाईगंजगोंदिया-वडसा-चंद्रपूर पॅसेंजर रेल्वेगाडी पूर्ववत सुरू... - खासदार नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांचे फलित.....

गोंदिया-वडसा-चंद्रपूर पॅसेंजर रेल्वेगाडी पूर्ववत सुरू… – खासदार नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांचे फलित.. – उद्याला विजय वडेट्टीवार सह मान्यवर दाखविणार हिरवी झेंडी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-कोरोना महामारीच्या कालावधीपासून ते कित्तेक महिने लोटूनही गोंदिया-वडसा-चंद्रपूर पॅसेंजर रेल्वे गाड्यांची चाके रुळावर थांबलेली होती.अशातच गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान निवडून येताच; त्यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात डेमू ट्रेन क्र.०८८०८,०८८०५ आणि ०८८०६ या पॅसेंजर रेल्वे गाड्या संदर्भात रोखठोक इंग्रजीत संभाषण ठोकत सरकारला जाब विचारून सर्वसामान्य नागरिक,व्यापारी वर्ग,विद्यार्थी तसेच इतरांसाठी बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात; अशी मागणी केली होती.त्यानुसार आज एक पॅसेंजर रेल्वेगाडी तर उद्याला दोन पॅसेंजर रेल्वेगाड्या रुळावर पूर्ववत धावणार असल्याने खासदार नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांचे फलित झाले आहे.त्यासाठी उद्या ८ सप्टेंबरला सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास  रेल्वे गाड्यांच्या स्वागतासाठी राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार,गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे उपस्थित राहून रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडी दाखविणार आहेत.त्यासाठी तालुक्यातील सर्व इंडिया- महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सकाळच्या सुमारास  देसाईगंज रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!