- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):- देसाईगंज शहरातील युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुल या ठिकाणी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेने शिक्षक दिनानिमित्त ‘एक दिवस विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा’ राबवित शाळेतील विद्यार्थ्यांनी अध्यापनाची जबाबदारी पार पाडली.
शाळेतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून एक दिवस संपूर्ण शाळा चालवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली होती.यामध्ये शालेय विद्यार्थिनी प्रणाली पडवेकर हिला मुख्याध्यापक होण्याचा मान मिळाला असून आस्था बोंडेकर हिने उपमुख्यध्यापक पदाची जबाबदारी सांभाळली तर प्रत्येक विषयाला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांकडून माझे आदर्श,भारतीय संस्कृती,स्वतंत्र सेनानी या विषयावर वेशभूषा परिधान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात डॉक्टर,शिक्षक, सावित्री,अश्या वेगवेगळ्या वेषभूषा परिधान करून शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतर्फे विविध कार्यक्रम पार पाडण्यात आले.प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रा.बाबा पडवेकर तर याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पंकज मेश्राम,शिक्षिका विशाखा ठवरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते.वेशभूषा स्पर्धा तसच इतर स्पर्धेच्या मूल्यांकनाची जबाबदारी
शिक्षक सोनपीपरे व शिक्षिका बगमारे यांनी पार पाडली तर श्रेया रणदिवे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
- Advertisement -

