Monday, June 22, 2026
Homeनागपूर२८ वर्षीय इसमास गॅस सिलेंडरच्या काळाबाजार प्रकरणी अटक...

२८ वर्षीय इसमास गॅस सिलेंडरच्या काळाबाजार प्रकरणी अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-लहान-मोठ्या गॅस सिलिंडरची काळाबाजारी करणाऱ्या एका रॅकेटचा नागपूर पोलिसांनी भंडाफोड केला आहे.गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.प्रीतपालसिंग ऊर्फ प्रीतगुरुचरणसिंग बागल वय २८ वर्षे,मिनीमातानगर, असे आरोपीचे नाव आहे.तो घरीच घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचा साठा करून त्यातील गॅस इतर सिलिंडरमध्ये भरून त्यांची अवैध पद्धतीने विक्री करत होता.पोलिसांना याची माहिती कळताच त्यांनी धाड टाकली.आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले.तो मशीनच्या साहाय्याने गॅस एका सिलिंडरमधून दुसऱ्यात भरत होता.या प्रकारामुळे आजूबाजूच्या वस्तीत जीवीतहानीचादेखील धोका होता.त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीचे घरगुती व व्यावसायिक प्रकारचे लहान व मोठे असे एकूण ५९ सिलिंडर,गॅस रिफिलिंग करण्याची मशीन व चारचाकी वाहन,असा ३.११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात कळमना पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक राहुल शिरे, राहुल रोटे,राजेंद्र टाकळीकर,अमोल भक्ते,विशाल नागभिडे, सुधीर तिवारी,आशिष पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी प्रीतकडे एचपी व स्थानिक कंपनीचे सिलिंडर्स आढळून आले.सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांसोबत त्याने हातमिळवणी केली असण्याची शक्यता आहे. काही काळाअगोदर मानेवाडा मार्गावरदेखील अशाच प्रकारची कारवाई झाली होती.सेंट्रल एव्हेन्यूवर काही रेस्टॉरन्ट चालकांना अशाच पद्धतीच्या रॅकेटच्या माध्यमातून अवैधपणे व्यावसायिक सिलिंडर पुरविण्यात येत होते.या प्रकरणात प्रीतला कुठल्या गॅस एजन्सीकडून इतके सारे सिलिंडर्स मिळाले व कुणाशी त्याची लिंक आहे; याची चौकशी होणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जफेडीसाठी दिलेला चेक बाऊन्स; दोषीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेचा चेक दिला खरी, पण जो चेक देण्यात आला,त्या बँकेच्या खात्यात पुरेसे पैसेच...

३० वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील कोतेवाडा परिसराच्या वेणा नदीत बुडून एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे,नदीतील...

अवैध तंबाखू साठवणूक व विक्री करणाऱ्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रात गुटखा,पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूवर राज्य शासनाने १९ जुलै २०१२ पासून सक्तीची बंदी लादली; मात्र गेल्या १४ वर्षांत ही बंदी कागदोपत्रीच...

शेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या वाघाच्या हालचालींवर वनविभागाची बारकाईने नजर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी(बा.)वनपरिक्षेत्रांतर्गत गोविंदपूर उपक्षेत्रातील नागभीड तालुक्याच्या गिरगाव जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे,रा.गिरगाव,ता.नागभीड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!