- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण व नॉन क्रिमीलेयर च्या अटी बाबत सुप्रिम कोर्टाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आज,२१ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या बंदला देसाईगंज शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
यादरम्यान विविध संघटनांनी एकत्र येवून फवारा चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली.रॅलीपूर्वी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. शेवटी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.यात राष्ट्रपतीनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाच्या नवव्या अनुसुचित समावेश करावा; अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
रॅलीमध्ये बौद्ध समाज कोअर कमेटी दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन,गोंडवाना गोटुल भुमी समिती, वंचित बहूजन आघाडी,कास्ट्राईब कल्याण महासंघ, त्रिरत्न समता संघ,आर्यसत्य बुद्ध विहार कमेटी, परमात्मा एक समिती,क्रांतीवीर बिरसा मुंडा समिती, नारायण सिंह ऊईके समिती,गरीब नवाज मस्जिद कमेटी,एकता सब्जी भंडार समिती मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
निवेदन देतेवेळी विजय बन्सोड,इंजि.नरेश मेश्राम, प्रकाश सांगोळे,हंसराज लांडगे,डाकराम वाघमारे, किशोर कुमरे,श्रीकृष्ण ऊईके,अनिल मडावी,बंडूभाऊ सिडाम,भिमराव नगराळे,सुरज ठवरे,सुनिल सहारे, मिना शेंडे,सुबोध मेश्राम,जगदीश तामगाडगे,राजरतन मेश्राम,भिमराव शेंडे,संतोष टेंभूर्णे,विलास लोखंडे, नागोराव ऊके,रोशन शेंडे,अक्षय सडमाके,रतनलाल सलामे,विलास लोखंडे,एम.ए.रामटेके,चंदुराव राऊत, मारोती जांभुळकर,चंद्रशेखर बांबोळे,प्रभु वैद्य,विजय पिल्लेवान,मनोज घायवान आदि ऊपस्थित होते. मार्गदर्शन कार्यक्रमाचे संचालन अरविंद घुटके यांनी केले.
- Advertisement -

