Tuesday, September 22, 2026
Homeगोंदियामहिलेच्या घरात शिरून छेड काढणाऱ्या ग्रामसेवकाला नागरिकांनी बदडले...

महिलेच्या घरात शिरून छेड काढणाऱ्या ग्रामसेवकाला नागरिकांनी बदडले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-रात्रीच्या सुमारास महिलेच्या घरात शिरून तिचा हात पकडून छेड काढणाऱ्या ग्रामसेवकाला नागरिकांनी सामुहिक चोप दिल्याची घटना तालुक्यातील नवरगावकला येथे सोमवारी दिनांक-१९ ऑगस्ट रोजी घडली.याप्रकरणाची अद्यापही पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही.मात्र,या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून; परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासन संपात सहभागी असताना,ग्रामसेवकाने सोमवारी १९ ऑगस्टला सायंकाळी गावातील एका महिलेच्या घरात जाऊन, त्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला.अश्यात महिलेने आरडाओरड केल्याने तिच्या घरातील मंडळी धावून आली.प्रकार उघडकीस येताच गावातील नागरिकांनी ग्रामसेवकाला भर चौकात चांगलाच चोप दिला असल्याचे बोलले जात आहे.अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडविले.या प्रकाराला घेऊन मध्यरात्री पर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात राडा होत राहिल्याची गुप्त महिती प्राप्त झाली.परंतु या प्रकरणाची अद्यापही तक्रार झाली नसल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. सदर घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून,प्रशासनाची मान खाली घालणाऱ्या ग्रामसेवकावर गटविकास अधिकारी कोणती कारवाही करतात? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
केवल कांबळे,तंटा मुक्त समिती अध्यक्ष, नवरगावकला👇
गावात घडलेला प्रकार सत्य असून,सदर प्रकारामुळे गावाच्या इभ्रतीला धक्का पोहोचला आहे.त्यामुळे सदर व्यक्तीवर कारवाही होणे अपेक्षित आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!