Tuesday, September 22, 2026
Homeदेसाईगंजआरक्षण संदर्भातील निर्णयाविरोधात देसाईगंज शहर कडकडीत बंद... -विविध सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या बंद...

आरक्षण संदर्भातील निर्णयाविरोधात देसाईगंज शहर कडकडीत बंद… -विविध सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या बंद ला व्यापाऱ्यांनी दिला प्रतिसाद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली) :-अनुसुचित जाती-जमाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण व नॉन क्रिमीलेयर च्या अटी बाबत सुप्रिम कोर्टाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आज,२१ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या बंदला देसाईगंज शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
यादरम्यान विविध संघटनांनी एकत्र येवून फवारा चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत रॅली  काढली.रॅलीपूर्वी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. शेवटी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत भारताचे  राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.यात  राष्ट्रपतीनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाच्या नवव्या अनुसुचित समावेश करावा; अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
 रॅलीमध्ये बौद्ध समाज कोअर कमेटी दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन,गोंडवाना गोटुल भुमी समिती, वंचित बहूजन आघाडी,कास्ट्राईब कल्याण महासंघ, त्रिरत्न समता संघ,आर्यसत्य बुद्ध विहार कमेटी, परमात्मा एक समिती,क्रांतीवीर बिरसा मुंडा समिती, नारायण सिंह ऊईके समिती,गरीब नवाज मस्जिद कमेटी,एकता सब्जी भंडार समिती मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
निवेदन देतेवेळी विजय बन्सोड,इंजि.नरेश मेश्राम, प्रकाश सांगोळे,हंसराज लांडगे,डाकराम वाघमारे, किशोर कुमरे,श्रीकृष्ण ऊईके,अनिल मडावी,बंडूभाऊ सिडाम,भिमराव नगराळे,सुरज ठवरे,सुनिल सहारे, मिना शेंडे,सुबोध मेश्राम,जगदीश तामगाडगे,राजरतन मेश्राम,भिमराव शेंडे,संतोष टेंभूर्णे,विलास लोखंडे, नागोराव ऊके,रोशन शेंडे,अक्षय सडमाके,रतनलाल सलामे,विलास लोखंडे,एम.ए.रामटेके,चंदुराव राऊत, मारोती जांभुळकर,चंद्रशेखर बांबोळे,प्रभु वैद्य,विजय पिल्लेवान,मनोज घायवान आदि ऊपस्थित होते. मार्गदर्शन कार्यक्रमाचे संचालन अरविंद घुटके यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!