Tuesday, September 29, 2026
Homeभंडाराअन् नंदी दूध व पाणी पितो तेव्हा.... - अफवा की चमत्कार...

अन् नंदी दूध व पाणी पितो तेव्हा…. – अफवा की चमत्कार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-तुमसर शहरात व काही गावात भगवान शंकराचे वाहन असलेली नंदीची मूर्ती दूध पीत असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.या व्हिडीओमध्ये नंदीची मूर्ती दूध पीत असल्याचा भक्तांचा दावा करून चमच्याने दूध पाजत असल्याचे दिसून येते.ही घटना तुमसर शहरासह हिंगणा या गावातील असून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेक भक्त मोठ्या संख्येने मंदिरात पोहोचून नंदीला दूध पाजत असल्याचे पाहावयास मिळत आहे.सध्या श्रावण महिना सुरू असून शिवभक्त हे मंदिरातील शिवपिंडी आणि नंदीची पूजा करून पाणी व दूध अर्पण करतात.दरम्यान, अशाच एक घटनेत एका इसमाने नंदीमूर्ती दूध पीत असल्याचा व्हिडिओ बनवून तो सोशय मीडियावर टाकला.हा व्हिडिओ व्हायरल होऊन अनेक भाविक हे शिवमंदिराकडे धाव घेऊन दूध व पाणी नंदीला पाजत असल्याचे दिसून आलेभक्त नंदीला दूध पाजत असताना चमचा वाकवल्यावर दूध कमी होते; पण जेव्हा चमचा सरळ धरला तेव्हा दूध तसेच राहते; असे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
मंदिरातील मूर्ती दूध किंवा पाणी पीत असल्याची अफवा पसरल्याची तुमसर शहरातील ही पहिलीच घटना नाही.गेल्या वर्षीही जुलै महिन्यात शिवमंदिरांमध्ये देवाने दूध पिल्याची अफवा वेगाने पसरली होती.मूर्तीचा वरच्या भागात दूध किंवा पाणी सोडल्यास ते खाली जाते; असा नियम आहे.मात्र,काही लोक या घटनेला चमत्काराशी जोडतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू; मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत...

सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी देसाईगंज तालुक्यात ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’.. – आज जुनी वडसा येथे विशेष शिबिराचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पुरवठा विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देसाईगंज तालुक्यात सर्व शिधापत्रिका धारकांसाठी ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’ सुरू करण्यात आले आहे.देसाईगंज तहसील कार्यालयाच्या तहसीलदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!