Saturday, June 20, 2026
Homeमुंबईशालेय गणवेशाविनाच मुले स्वातंत्र्यदिनाच्या प्रभात फेऱ्यांमध्ये झाले सहभागी...

शालेय गणवेशाविनाच मुले स्वातंत्र्यदिनाच्या प्रभात फेऱ्यांमध्ये झाले सहभागी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेचा फज्जा उडाल्याचे लाजीरवाणे चित्र देशाच्या स्वातंत्र्यदिनीच समोर आले.काही अपवाद वगळता राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाले नाहीत.गणवेश वाटपाची दिलेली दुसरी मुदत पाळण्यात सरकारला अपयश आले आहे.त्यामुळे गणवेशाविनाच मुले स्वातंत्र्यदिनाच्या प्रभात फेऱ्यांमध्ये सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
राज्यातील महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत गेल्यावर्षी महाराष्ट्रात ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना सुरू केली.राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचा गणवेश एका रंगाचा आणि एकसमान असावा,या उद्देशाने सरकारने ही योजना आणल्याचे सांगितले होते.परंतु,शाळा सुरू होऊन आता अडीच महिने उलटले तरी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना सरकारचा गणवेश मिळालेला नाही.१५ जून रोजी राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या.शाळा सुरू होतानाच सरकारने निश्चित केलेला गणवेश विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते.
काही ठिकाणी शाळांना १०० रुपयांत गणवेश शिवून देणारे बचत गट निश्चित करता आलेले नाहीत; अशी माहिती मिळते.त्यासाठी शोधाशोध सुरू आहे.तर काही ठिकाणी जिल्ह्यातील एकाच बचत गटाला सर्व शाळांचे गणवेश शिवण्याचे काम दिल्याने काम रखडल्याचे समोर आले आहे.सरकारी व्यवस्थेकडून मात्र याबाबत काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!