Saturday, June 20, 2026
Homeदेसाईगंजरोजगाराची हमी पण लवकर मजुरी मिळेना धनी...! - मजूर वर्गावर उपासमारीची वेळ....

रोजगाराची हमी पण लवकर मजुरी मिळेना धनी…! – मजूर वर्गावर उपासमारीची वेळ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):- शासकीय काम अन् तीन महिने थांब..! असे उगीचच म्हटले जात नाही.शासन स्तरावरून नवनवीन योजनांचे फंडे वापरून ‘संडे आणि मंडे’ केले जात आहे.नव्याचे ठीक आहे; पण जुण्याचे काय? जुन्या योजनेतील कितीतरी अनुदान वा रक्कम शासन स्तरावर अजूनही प्रलंबित आहे.अशातच जवळपास तीन महिन्याचा कालावधी लोटूनही रोजगाराची हमी पण लवकर मजुरी मिळेना धनी..! त्यातही रोजगार हमीवर काम केलेल्या मजुरांच्या कामाची मजुरी मिळण्याचे नावच घेत नसल्याने “मजा मारे सखाराम अन् सजा भोगे तुकाराम” अशी अवस्था रोजगार हमी योजनेमध्ये निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागात रोजगाराची कमतरता असल्याने मजूर वर्ग गावातील मिळणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या कामाकडे लक्ष देऊन असतात.महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत गावागावांत रोहयोची कामे केली जातात. शासनाच्या या कामामुळे व ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळत असतो; पण अशातच देसाईगंज तालुक्यातील गावागावांत रोजगार हमी योजनेच्या कामांची मजुरी अजूनपावेतो थकीत असल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.देसाईगंज तालुक्यात कोंढाळासह जवळपास प्रत्येक गावात रोहयोची कामे झाली आहेत.अजूनपर्यंत एकाही गावात मजुरांची मजुरी मिळालेली नाही.ग्रामीण भागातील लोकांचा हातावर आणावे व पानावर खावे असा दिनक्रम असतो.तसेच घरकूल बांधकामाचे बिल अडले आहेत.त्यातच रोजगार हमी योजनेची मजुरी मिळत नसल्याने मजूरवर्गासाठी शोकांतिकाच ठरली आहे.कोंढाळा येथील मजूरवर्ग आमचे पैसे मिळतील कधी? अशा आशेवर आहेत.त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी शासन स्तरावर मजुरांची मजुरी लवकरात- लवकर मिळण्याकरिता प्रयत्न करावेत; अशी अपेक्षा मजूर वर्गांकडून व्यक करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!