उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आरमोरी विधानसभा जिंकण्याच्या उद्धेशाने लढणार असल्याची माहिती जिल्हा महासचिव तथा आरमोरी विधानसभा प्रमुख राजरतन मेश्राम यांनी दिली. संपुर्ण महाराष्ट्रात ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वात आरक्षण बचाव ही मोहिम सुरु असुन बहुजन समाजातील अनेक जातींचा या मोहिमेला पाठिंबा मिळत आहे.लोकसभा निवडनुकीत संविधान बचाव हा मुख्य मुद्दा असल्याने आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची तानाशाही संपुष्टात आणन्याच्या उद्देशाने आंबेडकरी समाजाने भरभरुन कॉंग्रेस पक्षाला मतदान केले.मात्र,कॉंग्रेस पक्षाने दिशाभुल केली.महाविकास आघाडी सोबत युती नसतांनाही ॲड.बाळासाहेब आंबेडकरांनी नागपुर,सोलापुर,सातारा,बारामतीसह ७ जागांवर आपले उमेदवार उभे केले नाही.मात्र,अकोला मतदार संघात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून कॉंग्रेसने बाळासाहेबांना निवडुन येण्यासाठी उमेदवार उभे करायला नको होते.मात्र कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्या नंतरही प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पराभुत उमेदवाराची सांत्वन सभा घेतली म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांना संसदेत पोहचु द्यायचे नाही; ही मानसिकता नाना पटोले यांनी प्रदर्शीत केली.हीच मानसिकता कॉंग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांविषयी बाळगली होती.आंबेडकरी समाज कॉंग्रेस पक्षाचा गुलाम नाही.या समाजाचे आरमोरी विधानसभेत मोठे अस्तित्व आहे.अनुसुचित जमातिसाठी ही जागा आरक्षित असल्याने या समाजाचे किमाण २० हजार मते घेणारा उमेदवार मिळावा; याची चाचपणी सुरु असुन समाज बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.लवकरच उमेदवाराची घोषणा होणार असुन भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा रंगतदार सामना आरमोरी विधानसभा क्षेत्रात पहावयास मिळेल; अशी माहीती वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा प्रमुख तथा जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम यांनी दिली.

