Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन ७ ऑगस्टला…-गडचिरोली जिल्ह्यातून जाणार ३००...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन ७ ऑगस्टला…-गडचिरोली जिल्ह्यातून जाणार ३०० ओबीसी बांधव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन ७ ऑगस्टला पंजाबमधील अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाला जिल्ह्यातील जवळपास ३०० ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना,ओबीसी क्रिमिलेअर मर्यादावाढ,स्वतंत्र ओबीसी मंत्रालय,आरक्षणासाठी ५० टक्क्यांची अट रद्द करा,यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मंथन होईल.समारोपीय सत्रात या अनुषंगाने ठरावही पारित केले जाणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते होईल.प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर,दिनेश चोखारे,महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!