Thursday, August 6, 2026
Homeनवी दिल्लीमहिलांना मिळालेल्या विशेषाधिकाराचा त्यांनी दुरुपयोग करू नये...-खोट्या आरोपात महीलेविरूद्ध कारवाईचे न्यायालयाने दिले...

महिलांना मिळालेल्या विशेषाधिकाराचा त्यांनी दुरुपयोग करू नये…-खोट्या आरोपात महीलेविरूद्ध कारवाईचे न्यायालयाने दिले आदेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या एका महिलेवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.व्यक्तिगत बदला घेण्याच्या उद्देशाने महिलांना मिळालेल्या विशेषाधिकाराचा त्यांनी दुरुपयोग करू नये,अशी टिप्पणीही अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेफाली बर्नाला टंडन यांनी केली.अशा प्रकारच्या खोट्या आरोपांमुळे आरोपीचे आयुष्य आणि सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचते,असेही न्यायालयाने म्हटले आहे.आरोपीच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली.यावेळी प्रकरणातील तथ्ये पाहता न्यायालयाने म्हटले की,१४ जुलैला व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी महिलेने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर,स्वखुशीने त्याच्यासोबत हॉटेलमध्ये गेले होते.याठिकाणी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले होते,असा जबाब दिला आहे.आरोपीसोबत भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात महिलेने बलात्काराचा आरोप केला,असेही न्यायालयाने म्हटले.

आमच्या देशात पुरुषांना घटनेनुसार समान कायदेशीर अधिकार,सुरक्षा आहे.तथापि,महिलांना काही विशेषाधिकार आहेत.परंतु महिलांना त्याचा बदला घेणे किंवा छुपे हेतू करण्यासाठी तलवार म्हणून उपयोग करू नये.समाजात मोठ्या प्रमाणावर हेच होताना दिसत आहे.आजकाल कारण दुसरेच असते आणि आरोप मात्र बलात्काराचे लावले जातात.हेही यातलेच एक प्रकरण आहे.बलात्काराच्या खोट्या आरोपामुळे आरोपीचे आयुष्य तर उद्धवस्त होतेच, पण त्याच्या कुटुंबीयांच्या सामाजिक प्रतिष्ठेलाही ठेच पोहोचते.बलात्कार हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे.पीडितेचे शरीरच नव्हे,तर आत्म्यावरही तो आघात करतो.परंतु काही प्रकरणात बलात्कारविरोधी कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे.हे अत्यंत गंभीर आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!