Wednesday, September 30, 2026
Homeभंडाराशेतातील विजेच्या जिवंत तारांना स्पर्श होताच तरुणाचा मृत्यू..-पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह...

शेतातील विजेच्या जिवंत तारांना स्पर्श होताच तरुणाचा मृत्यू..-पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकला शेततळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- शेतात टाकलेल्या विजेच्या तारांचा विद्युत शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला.घटनेची माहिती त्याच्या सहकारी तरुणाने काकांना दिली. त्यानंतर काकाने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी शेताच्या आवारात लावलेल्या वीज तारा काढत तरुणाचा मृतदेह शेततळ्यात फेकून दिला.ही खळबळजनक घटना साकोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खांबा येथे घडली.शैलेश रहांगडाले वय २९ वर्षे असे मृताचे नाव आहे.

माहितीनुसार,आरोपींनी उसाच्या शेताच्या आवारात विजेच्या जिवंत तारा टाकल्या होत्या.१२ जुलै रोजी सायंकाळी पियुष हा शैलेशसोबत शेतात गेला होता. तेथे करंट असल्याचे माहीत असूनही पियुषने स्वतः काही अंतरावर उभे राहून शैलेशला बांबू आणण्यासाठी शेतात पाठवले.पियुषच्या डोळ्यासमोर शैलेशचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला.पियुषने हा प्रकार काका नारिक यांना सांगितला.त्यानंतर नारिकने शेतात जाऊन विद्युत तारा काढून शैलेशचा मृतदेह शेत तळ्यात फेकून दिला.दुसरीकडे शैलेश घरी न आल्याने कुटुंबीयांनी या दोघांकडे चौकशी केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शैलेशचे वडील संजू रहांगडाले वय ५१ वर्षे यांनी साकोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.प्रकरणाचा तपास करत असलेले सहायक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी सांगितले की,कसून चौकशी केल्यानंतर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.१३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या सूचनेवरून मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला.पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १०५,२३८ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी नाजुक रहांगडाले वय ५० वर्षे आणि पियुष रहांगडाले वय १९ वर्षे या दोन आरोपींना अटक केली.साकोली न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.या घटनेने परिसरात विविध चर्चाना ऊत आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

कुष्ठांतेयांची तालुका स्तरावर ११ सदस्यीय कार्यकारिणी गठित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,भिसी येथे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या माध्यमातून २८ सप्टेंबर रोजी कुष्ठांतेयांची सभा आयोजित करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी...

सावधान..! वनविभागातील नोकरीचे आमिष पडू शकते महागात.. – वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांची भरती आणि नियुक्ती शासनाच्या विहित नियमांनुसारच..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील विविध भागांत काही व्यक्ती वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांवर नियुक्ती करून देण्याचे खोटे आमिष दाखवून उमेदवारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!