Monday, August 31, 2026
Homeगोंदियामोबाईल कंपनीला एक चूक पडली महागात…-ग्राहकाला मोबाईल सह द्यावी लागली नुकसान भरपाई…-ग्राहक...

मोबाईल कंपनीला एक चूक पडली महागात…-ग्राहकाला मोबाईल सह द्यावी लागली नुकसान भरपाई…-ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- मोबाइल कंपनीने चुकीने ऑनलाइन सॅमसंग गॅलेक्सी ए २२ अल्ट्रा ५ जी या मोबाइलची किंमत कंपनीच्या संकेतस्थळावर १६,५५८ रुपये दाखविली.दरम्यान गोंदिया शहरातील पाच व्यक्तींनी ते बुक केले.तसेच त्याचे पैसेसुद्धा कंपनीच्या अकाऊंटवर पाठविले.मात्र या मोबाइलची मूळ किमत १ लाख ३१ हजार ९९९ रुपये होती.पण कंपनीकडून चुकीने ऑनलाइन किमत कमी दाखविण्यात आली. त्यामुळे कंपनीने ऑनलाइन दाखविलेल्या किमतीत मोबाइल देण्यास संबंधित ग्राहकांना नकार दिला. त्यामुळे ग्राहकांनी याविरोधात ग्राहक मंचात धाव घेतली. ग्राहक मंचाने कंपनीला ऑनलाइन दाखविलेल्या किमतीत मोबाइल आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.त्यामुळे कंपनीला एक चूक १ लाख ४१ हजार रुपयात पडली.

३१ मार्च २०२२ रोजी, एका ई- कॉमर्स कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर १ लाख १५ हजार ४४१ मूळ किमत असलेल्या मोबाइलवर ८७ टक्के सूट देत तो केवळ १६,५५८ रुपये किमतीला विक्रीला ठेवला. कंपनीच्या संकेतस्थळावर ही ऑफर पाहून गोंदिया येथील स्वाती संजय जैन,जितेंद्र गुमाचंद जैन,दिलीप मंगलचंद जैन,पीयूष दिलीप जैन व पायल खुशाल जैन यांनी त्वरित त्या मोबाइलसाठी ऑनलाइन ऑर्डर बुक केली आणि १६,५५८ रुपये प्रत्येकाने त्यांच्या डेबिट कार्डद्वारे पाठविले.त्यानंतर २ एप्रिल २०२२ रोजी, सर्व तक्रारदारांना या कंपनीकडून एक मेल प्राप्त झाला. काही तांत्रिक चुकीमुळे संकेतस्थळावर मोबाइलची किमत कमी दाखविण्यात आली.त्यामुळे त्या किमतीत मोबाइल देणे शक्य नसल्याचे सांगत या पाचही ग्राहकांचे पैसे परत केले.मात्र या पाचही ग्राहकांनी ही आपली फसवणूक असल्याचे सांगत संकेतस्थळावर दाखविलेल्या किमतीत मोबाइल देण्याची विनंती मेलद्वारे कंपनीला केली.परंतु कंपनीने नकार दिल्याने तक्रारदारांनी ॲड.सागर जे.चव्हाण यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक आयोग गोंदिया येथे कंपनी विरोधात याचिका दाखल केली.

ॲड.सागर चव्हाण यांनी न्यायालयात युक्तिवाद करून कंपनीने तक्रारदारां- सोबत मोबाइल विक्रीचा करार केला व तक्रारकर्त्याच्या संमतीशिवाय कराराचे उल्लंघन केले आहे.ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत अनुचित व्यापार व्यवहारसुद्धा असल्याचा युक्तिवादसुद्धा ॲड.चव्हाण यांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेत ३ जुलै रोजी ग्राहक आयोगाचे अध्यक्ष नितीनकुमार स्वामी, सदस्य अतुल आळसी आणि संजय जोशी यांच्या पीठाने ग्राहकांची बाजू योग्य असल्याचे सांगत पाच ग्राहकांना संकेतस्थळावर दाखविलेल्या किमतीत मोबाइल ४५ दिवसांच्या आत देण्याचे व तक्रारदाराला झालेल्या त्रासासाठी नुकसान भरपाई ७ हजार रुपये व तक्रार दाखल करण्यासाठी आलेला खर्च ३ हजार रुपये देण्याचे आदेश कंपनीला दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!