Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरवाघाने गुराख्यावर चढवला हल्ला; गुराखी जखमी..-गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल..

वाघाने गुराख्यावर चढवला हल्ला; गुराखी जखमी..-गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- सावली तालुक्यातील व्याहड खुर्द उपवनपरिक्षेत्रातील सिर्सी वनबिटात गुराख्यावर वाघाने हल्ला चढविला.सुदैवाने गुराखी यातून बचावला असला तरी तो गंभीर जखमी झाला आहे. मुकरू भिकाजी भोयर वय ४५ वर्षे रा.कढोली असे जखमीचे नाव आहे.ही घटना काल,सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

मुकरू भोयर हा गावाजवळच्या जंगल परिसरात गुरे चरायला घेऊन गेला होता.गुरे चारत असताना झुडुपात दबा धरून असलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर झडप घातली.गुराख्याने वाघाच्या हल्ल्याचा प्रतिकार करीत असताना आरडाओरड केली.या आवाजाने गावाशेजारील नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली.मात्र वाघाने मुकरू भोयर याला गंभीर अवस्थेत जखमी करून धूम ठोकली होती.नागरिकांनी घटनास्थळावर जखमी अवस्थेत पडलेल्या गुरख्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.माहिती मिळताच क्षेत्र सहायक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सिर्सी वनबीटाचे वनरक्षक मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.या परिसरात शुक्रवारी रात्री ८:३० वाजताच्या एका चारचाकी वाहनधारकाला रस्त्यावर दिसला होता.यानंतर वाघ याच परिसरात होता.या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले वाघाचा बंदोबस्त करावा; अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!