Monday, September 21, 2026
Homeजळगावधावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलणे चालकाला पडले महागात; चौकशी अंती चालक निलंबित…

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलणे चालकाला पडले महागात; चौकशी अंती चालक निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

जळगांव :- लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे.एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.मात्र,धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्यामुळे एका चालकाला चौकशी अंती निलंबित करण्यात आले आहे.

पाचोरा आगारातील चालक गणेश ठाकरे याला एस.टी.महामंडळाने निलंबित केले आहे.२७ मे रोजी सकाळी ७:३० वाजता पाचोरा आगारातून पाचोऱ्याहून जळगावकडे जाणारी बस क्रमांक – एम.एच.१४ बी.टी.२६३४ ह्या बसचा चालक गणेश ठाकरे हा बस चालवत होता.त्याच वेळेला तो मोबाइलवरदेखील बोलत होता.त्याला काही प्रवाशांनी हटकले.त्यानंतर त्याने प्रवासी आणि वाहक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले.प्रवाशांशी हुज्जत घातली.तो मोबाईलवर बोलत असतानाचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते.त्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पांडे यांनी केली होती. ठाकरे याने तब्बल २० मिनिटे फोनवर संभाषण केल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.यानंतर मुंबई कार्यालयाने जळगाव येथील विभाग नियंत्रकांना सदर चालकाची चौकशी करून कारवाई करण्याचे सूचित केले होते.त्यानुसार त्याची चौकशी केली असता तो दोषी आढळून आला.त्यानुसार व प्रवाशाच्या तक्रारीनंतर चालकाला एसटी महामंडळाकडून निलंबित करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!