Wednesday, September 23, 2026
Homeकोरचीअखेर विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटिंबियांना २५ लाख रुपयांचे धनादेश वितरीत…-आदिवासी...

अखेर विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटिंबियांना २५ लाख रुपयांचे धनादेश वितरीत…-आदिवासी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव छगन शेडमाके यांच्या प्रयत्नांना यश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरची(गडचिरोली) :- रोजगाराच्या शोधात छत्तीसगडवरून कोरची तालुक्यातील बोरी येथे एबीस पोल्ट्री कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा,काम करीत असतांना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. प्रशांत चोपडे वय २५ वर्षे,रा.बंजारी,छत्तीसगड असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.सदरची घटना २७ जूनला सायंकाळी घडली होती.घटने बाबत आदिवासी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव छगन शेडमाके यांना माहिती मिळताच लगेच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.घरातील कर्ता तरुण मृत्युमुखी पडल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला होता.घटनेनंतर छगन शेडमाके यांनी कंपनी व्यवस्थापनास जाब विचारला व कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून २५ लाख रुपयांची भरपाई कंपनी प्रशासनाने कुटुंबीयांना द्यावी; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.याची दखल घेत कंपनी व्यवस्थापनाने अवघ्या एका आठवड्यातच २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य कामगाराच्या कुटुंबीयांना दिले असल्याने शेडमाके यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.अशातच मृत प्रशांतच्या आई पुस्तकला चोपडे यांना दरमहा साडेचार हजार रुपये अर्थसहाय्य केले जाईल,असे आश्वासनही कंपनी प्रशासनाकडून देण्यात आले आहे.दुर्दैवाने घरातील कर्ता तरुण गमावलेल्या कुटुंबीयांना आधार झाल्याने कुटुंबीयांनी शेडमाके यांचे आभार मानले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!