Tuesday, September 22, 2026
Homeकोंढाळायुवकांना लग्नासाठी मुलगी मिळेना...!- वढिलधारी म्हणतात लग्नासाठी कुणीही चालेल...

युवकांना लग्नासाठी मुलगी मिळेना…!- वढिलधारी म्हणतात लग्नासाठी कुणीही चालेल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोंढाळा :- हल्ली युवक वर्गांना लगीनघाई झाली असल्याने व  रितिरिवाजाप्रमाणे लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने कित्येक तरुण-युवक वयोमर्यादा ओलांडून ‘बाबा लगीन’असे म्हणणाऱ्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढतच चालले आहेत.अशातच कित्येक वढिलधारी माणसे म्हणतत् की, ‘बाबारे कुठलीही मुलगी आण ! … आम्ही तीला सून म्हणून स्वीकारुच’अशी केविलवाणी बाब निदर्शनास येऊ लागली आहे.

कोणतेही आई-वडील आपल्या मुलीचा संसार सुखाचा जावा याकडे लक्ष घालीत असतात.मुलगा कसा असावा,काय करतो,शेती किती आहे व इतर गोष्टींचा पुरेपूर विचारविनिमय करूनच लग्नाची गाठ बांधली जाते.अशातच याला अपवाद म्हणून मुलींच्याही  अपेक्षा वाढतच चालल्या असल्याने मुलांना मुलगी मिळणे कठीण झाले आहे.त्यामुळे प्रेमप्रकरणे वाढून ‘जे होणार ते बघितले जाणार’अशा भ्रमात युवक-युवती गेले असल्यानेच पळवून जाणाऱ्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढून सर्वकाही गमावून बसले आहेत; तर कुणाचे संसार सुखी-समृद्ध आहेत.

पूर्वी मुलीचे वडील लग्नासाठी मुलगा शोधायला जायचे.मात्र आजची परिस्थिती बदलली आहे. सध्याच्या घडीला लग्न करण्यासाठी मुलगा,मुलगी शोधायला निघाला असल्याची बाब निदर्शनास येऊ लागली आहे.इकडे वयोमर्यादा ओलांडूनही कित्तेकांचे विवाह होत नसल्याने मुलांकडील वढिलधारी म्हणतात की, ‘बाबारे कुठलीही मुलगी घेऊन ये…! ही आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!