Monday, July 13, 2026
Homeमुंबई'या' ठिकाणच्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलल्या…

‘या’ ठिकाणच्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलल्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- पाऊस जास्त असलेल्या ठिकाणच्या उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.मात्र,पावसाचे पुढचे दिवस आणि आचारसंहितेची शक्यता लक्षात घ्यावी लागेल.वेळ घालविल्यास काही उमेदवारांचे वय निघून जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिथे पाऊस नसेल तिथे भारती प्रक्रिया सुरू राहील; असे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल,शुक्रवारी स्पष्ट केले.राज्यात गृह विभागांतर्गत १७ हजार ४७१ पदांसाठी १९ जूनपासून पोलिस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.मात्र,अनेक ठिकाणी पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी चाचणीत अडथळे येत आहेत. त्यामुळे गुणांकनावर परिणाम होत असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले,ज्या ठिकाणी पाऊस आहे; त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.यापुढे आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे.त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होईल.अशावेळी मैदानी चाचण्या आणखी पुढे गेल्या तर वयाच्या अटीमुळे अनेक उमेदवारांच्या भविष्यावर परिणाम होईल.मात्र,त्या उमेदवारांना संधी मिळायला हवी; याकडेही त्यांनी लक्ष वेधले.पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला असेल,त्या ठिकाणी मैदानी चाचणी घेण्यासाठी पुढच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत.पण ज्या जिल्ह्यांत पाऊस नाही,तेथे भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.तसेच जे विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी येत आहेत; त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला सूचना केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!