Thursday, August 27, 2026
Homeभंडाराउष्माघाताने तब्बल दीड हजार कोंबड्या मृत्यूमुखी..-महावितरणने नुकसान भरपाई देण्याची मागणी…

उष्माघाताने तब्बल दीड हजार कोंबड्या मृत्यूमुखी..-महावितरणने नुकसान भरपाई देण्याची मागणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज 

भंडारा :- जिल्ह्यात नवतापाचा कहर सुरू असून, तापमान ४२ अंशापुढे गेले आहे. असे असले तरी वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना कसलीही पूर्व सूचना न देता तब्बल ४ तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे.याचा फटका पोल्ट्री फार्मना बसला आहे.उष्माघाताने तब्बल दीड हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याची घटना लाखनी तालुक्यातील केसलवाडा/वाघ येथे उघडकीस आली आहे.या मध्ये पोल्ट्री फार्म चालकाचे लक्षावधी रुपयाचे नुकसान झाले आहे.

पोल्ट्री फार्म संचालक छगन वाघाये यांच्या कुटुंबाकडे संयुक्त अंदाजे ३ हेक्टर शेतजमीन असून ते स्नातक आहेत.नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगारासाठी त्यांनी ६ वर्षापूर्वी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून ५ लाख रुपयाचे अर्थसाहाय्य घेऊन पोल्ट्री फार्मचा व्यवसाय थाटला होता.अल्पावधीतच त्यांनी हा व्यवसाय प्रगतीपथावर नेला. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. पोल्ट्री फार्ममध्ये बॉयलर प्रताजीच्या कोंबड्याकरिता आवश्यक त्या सर्व सुविधा त्यांनी केल्या होत्या.

सध्या नवतपा सुरू आहे.त्यातच तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे.उन्हामुळे मानवापासून तर प्राणी व पक्षीही त्रस्त आहेत.अशातच वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना कसल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता तब्बल ४ तास वीज पुरवठा बंद केल्यामुळे उष्माघाताने पोल्ट्री फार्म मधील १ हजार ५३१ बॉयलर प्रजातीच्या कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीला वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याने महावितरणने नुकसान भरपाई द्यावी; अशी त्यांची मागणी आहे.मृत कोंबड्यांना जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून पुरण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!