Sunday, June 28, 2026
Homeसिंदेवाहीझुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने इसमास केले ठार…

झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने इसमास केले ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

सिंदेवाही(चंद्रपूर) :- सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असून या माध्यमातून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होत आहे.नेहमी प्रमाणे प्रभाकर सहकाऱ्यासह जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेला होता.तेंदू गोळा करीत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्याला ठार केले.

सदरची घटना वन विभाग कारघाटा कंपार्टमेंट नंबर २५७ मधील कच्छेपार कारघाटा जंगल परिसरात घडली.ही घटना काल,रविवारी २६ मे रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास घडली.प्रभाकर अंबादास वेठे वय ४८ वर्षे रा. डोंगरगाव असे मृतकाचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस विभागाचे निरीक्षक तुषार चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे अधिकारी सालकर व अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने गोळा झालेल्या नागरिकांसोबत यशस्वी तोडगा काढत मृतदेह ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रवाना केले.त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!