Thursday, October 1, 2026
Homeगोंदियादुचाकितून धूर निघताच घेतला पेट; दुचाकी जळून खाक..

दुचाकितून धूर निघताच घेतला पेट; दुचाकी जळून खाक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवेगाव(गोंदिया) :- धावत्या मोटारसायकलने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण मोटारसायकल जळून राख झाल्याची घटना काल,रविवारी २६ मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील नवेगाव येथील आश्रमशाळेजवळ घडली.सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली.मात्र, मोटारसायकल जळाल्याने आर्थिक नुकसान झाले. 

प्राप्त माहितीनुसार,महालगाव येथील रहिवासी संजय अटराहे हे आपल्या मोटारसायकलने रविवारी दुपारी महालगाव येथून गोंदियाला जात होते.नवेगाव येथील आश्रमशाळेसमोर त्यांच्या चालत्या मोटारसायकलमधून धूर निघण्यास सुरुवात झाली.त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला मोटारसायकल उभी केली.दरम्यान,मोटारसायकलने पेट घेतला.यात काहीच वेळात संपूर्ण गाडी जळून खाक झाली.मोटारसायकल चालकाला धूर निघत असल्याचे लक्षात आल्याने दुचाकी थांबविल्यामुळे जीवित हानी टळली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर उद्या होणारा व्यापारी संघटनांचा ‘नो यूपीआय डे’ मागे..!

उद्रेक न्युज वृत्त :-यूपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट(MDR)लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.या निर्णयाचा तीव्र निषेध...

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांचा निरोप समारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा...

गडचिरोलीत गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण; १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना दिली लस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व...

आजपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाशांना एक ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा कडक निर्णय घेत 'आरक्षित' केलेल्या तिकिटांवर किंवा 'ई-पास'वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!