Friday, September 4, 2026
Homeब्रम्हपुरीचोरट्यांनी दारूच्या बाटल्यासह रोकडही नेली चोरून…

चोरट्यांनी दारूच्या बाटल्यासह रोकडही नेली चोरून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- ब्रम्हपुरी शहराच्या ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गालगत असलेल्या एका बारचे शटर तोडून अज्ञात आरोपींनी रोकड लंपास केली.ही घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली.बार मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ब्रम्हपुरी येथील चिलआऊट बारच्या मालकाने नेहमीप्रमाणे दि.२३ मे च्या रात्री ११:३० वाजता बार बंद करून बार मालक व मॅनेजर घरी निघून गेले.दुसऱ्या दिवशी मालकाला बाहेरगावी जायचे असल्याने त्याने २४ हजार रुपये रोख बारमध्येच ठेवली.दुसऱ्या दिवशी मॅनेजरला रोकड बँकेत जमा करण्यास सांगितले.दुसऱ्या दिवशी सकाळी मॅनेजर बार उघडण्यासाठी आले असता बारचे शटर वाकविल्याचे त्यांना दिसले.लगेच याची माहिती बारमालकाला देण्यात आली.त्यानंतर ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बार मालक भूषण मुकेश रामटेके यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहेत.

बारच्या खालील भागात एक हॉटेल आहे.घटनेच्या दिवशी साधारण एक वाजता हॉटेल बंद झाले. त्यानंतर दीड वाजताच्या सुमारास दोन चोरटे दुचाकीने आले.दुचाकी ठेवली, व पायऱ्यांनी वर चढले.हे दृश्य बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.शटर लोखंडी रॉडने वाकवून दोघे आत शिरले.यावेळी दोन्ही चोरट्यांनी तोंडाला कापडाने झाकले होते.ते थेट लॉकरजवळ गेले.लॉकर मधील रोख व बाजूला असलेल्या दारूच्या बॉटल त्यांनी बॅगेत टाकल्या.हे दृश्य आतील कॅमेऱ्यात कैद झाले.सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.अगदी वर्दळीच्या व मुख्य महामार्गालगत ही चोरी झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!