Thursday, August 27, 2026
Homeभंडाराआंघोळ करताना खोल पाण्यामध्ये गेला अन् जीव गमावून बसला...-१९ वर्षीय तरुणाचा वैनगंगा...

आंघोळ करताना खोल पाण्यामध्ये गेला अन् जीव गमावून बसला…-१९ वर्षीय तरुणाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- वैनगंगा नदीपात्रात आंघोळीला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना तुमसर तालुक्यातील रेंगेपार (पांजरा) येथे घडली.आस्तिक नंदकुमार दमाहे वय १९ वर्षे, रा. बपेरा असे मृत तरुणाचे नाव आहे.

आस्तिक हा आपल्या मामाच्या घरी लग्नासाठी रेंगेपार येथे आला होता.दरम्यान,मित्रांसोबत वैनगंगा नदीपात्रात आंघोळीला गेला होता.आंघोळ करताना तो खोल पाण्यामध्ये गेला.त्याला पोहता येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. दरम्यान सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केल्याने नदीपात्रात मासेमारी करणारे लोक धावत येऊन आस्तिकला पाण्याच्या बाहेर काढले.

यानंतर आस्तिकला उपचारासाठी सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.सिहोरा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय तुमसर येथे रवाना केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!