Tuesday, July 14, 2026
Homeमुंबईदहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी…-पुढील आठवड्यात बारावीचा निकाल तर मे महिन्याच्या शेवटी लागणार...

दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी…-पुढील आठवड्यात बारावीचा निकाल तर मे महिन्याच्या शेवटी लागणार दहावीचा निकाल 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- राज्यातील स्टेट बोर्डाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेचे निकाल लवकरच म्हणजे याच महिन्यात लागणार आहे.शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार,बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या,तर दहावीचा निकाल चौथ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.सध्या निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीच्या परीक्षांचे आयोजन केले होते.त्यानंतर आता या दोन्ही वर्गांच्या विद्यार्थी व पालकांना निकालाचे वेध लागलेत.त्यातच सीबीएसईच्या दहावी व बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यामुळे स्टेट बोर्डाच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीचा निकाल लवकरच लागण्याची महत्त्वाची बातमी आली आहे.

बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल.त्यानंतर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल घोषित केला जाईल.दहावीच्या परीक्षेचे पेपर तपासणीचे काम हातावेगळे झाले आहे.आता निकाल तयार करण्याच्या कामावर शेवटचा हात फिरवला जात आहे.हे काम झाले तर मे महिन्याच्या शेवटी हा निकाल जाहीर केला जाईल.

बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमकि परीक्षा मंडळ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर करु शकते.दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम बोर्डाकडून तयार झाले आहे.उत्तर पत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून आता निकालाच तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!