Thursday, July 30, 2026
Homeचंद्रपूरवाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू…-पिकांची होणारी नासाडी रोखण्याकरीता जायचा जागलीला…

वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू…-पिकांची होणारी नासाडी रोखण्याकरीता जायचा जागलीला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील खानगाव शेतशिवारात स्वतःच्या शेतात पिकांची राखण करण्याकरीता गेलेल्या एका युवक शेतकऱ्याला वाघाने हल्ला करून ठार केले असल्याची घटना आज दिनांक -१५ मे रोजी सकाळी उघडकीस आली.सदर घटनेनंतर नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.अंकुश श्रावण खोब्रागडे वय ३३ वर्षे,रा. खानगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

चिमूर तालुक्यातील खानगाव निवासी युवक अंकुश श्रावण खोब्रागडे स्वतःच्या शेतामध्ये दररोज जनावरांपासून पिकांची होणारी नासाडी रोखण्याकरीता जागलीला जात होता.काल मध्यरात्री अंकूशला शौचास लागल्यामुळे तो शेतालगत नदीपाटाजवळ गेला होता.याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. यामध्ये तो जागीच ठार झाला.

आज बराचवेळ होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ हेमराज हा शेतात त्याला पहायला गेला.शेतात चप्पल व मोबाईल आढळून दिसले.अथंरूणावर तो आढळून आला नाही.त्यामुळे त्याची शोधाशोध करण्यात आली.काही अंतरावरील नदीपाटात मृतदेह आढळून आला.या घटनेची माहिती गावात पसरली.वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.नागरिकांमध्ये प्रचंड वनविभागाविरोधात आक्रोश निर्माण झाला. नागरिकांचा संताप वाढत असताना परिस्थीती नियंत्रणाबाहेर जात असतानाच वनविभागाने शेगाव पोलीसांना पाचारण केले.ठाणेदार योगेंदरसिंग यादव यांचे पथक दाखल झाले.

जो पर्यंत मृतकाच्या कुटूंबियांना मोबदला मिळणार नाही,तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही; अशी भूमिका घेऊन गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले.वनविभागाचे एस एफ हजारे यांना घटनेची माहिती दिली.काही वेळात ते घटनास्थळी दाखल झाले.गावकऱ्या सर्व मागण्यांचे स्टॅम्पपेपरवर लेखी हमी पत्र दिल्यानंतर मृतदेह उचलू देण्यात आला.चिमूर उपजिल्हा रुग्णालयात शवविचछेदनाकरीता मृतदेह पाठविण्यात आला.यावेळी मृतकाच्या कुटूंबियाना नगदी एक लाखाची नगदी तर ४ लाखांचा चेक देण्यात आला. शवविच्छेदनानंतर उर्वरित आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन वनविभागाने दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!