Thursday, July 30, 2026
Homeकुरखेडातेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजूरांवर जंगली हत्तीच्या कळपाने केला हल्ला-कुरखेडा तालुक्यातील घटना..

तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजूरांवर जंगली हत्तीच्या कळपाने केला हल्ला-कुरखेडा तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 कुरखेडा(गडचिरोली) :- जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजूरांवर जंगली हत्तीच्या कळपाने हल्ला चढविल्याची घटना काल,मंगळवारी (दि.१४) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या घाटी जंगलात घडली.सुदैवाने मजुरांनी जीवाच्या आकांताने पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली.सविस्तर वृत्त असे की,कुरखेडा तालुक्यातील घाटी जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गावातील जवळपास ३५० च्या संख्येत असलेल्या मजूरांचा जत्था मंगळवारी पहाटेच्या सुमारास जंगलात गेला होता.मजूर तेंदू संकलनाचे काम करीत असताना हत्तींचा कळप त्यांच्या दिशेने येऊ लागल्याची चाहूल मजुरांना लागली.लागलीच त्यांनी तोडलेल्या पानांसह साहित्य घटनास्थळी टाकून देत जीव वाचविण्यासाठी धाव घेतली.

यादरम्यान ईश्वर भोयर वय ५५ वर्षे रा.घाटी हा हत्तींच्या कळपाच्या वेढ्यात सापडला.त्याने जीव वाचविण्यासाठी एका झाडावर चढण्याचा प्रयत्न केला.ते झाड मोडल्याने तो पुन्हा जमिनीवर आदळला.मात्र दैव बलवत्तर जखमी अवस्थेतही त्याने हत्तींच्या कळपातून शिताफीने पळ काढित स्वतःचा जीव वाचविला.या पळापळीदरम्यान अनेक मजुरांच्या दुचाकी,सायकली तसेच इतर साहित्य जंगलातच राहून गेले.घटनेची माहीती प्राप्त होताच वनविभागाच्या पथकाने घाटी गावाकडे धाव घेतली. यावेळी संतप्त मजुरांनी वनकर्मचाऱ्यांना घेराव घालित हत्तींच्या संचाराबाबत माहिती का दिली नाही; असा जाब विचारित त्यांना धारेवर धरले.या प्रकरणाला वनविभागाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!