उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- एका दांपत्याने कपड्याचे दुकान सांभाळायला देणाऱ्या मालकाचीच १८.९० लाखांनी फसवणूक केली.दिवाळीच्या काळात ५६ दुकानदारांकडून आलेले पैसे दांपत्याने परस्पर स्वतःकडेच ठेवून घेतले.धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली.
जरीपटका येथील महेश सुंदरलाल जेठानी वय ४५ वर्षे व भव्या जेठानी वय ३४ वर्षे अशी आरोपी दांपत्याची नावे आहेत.सुरेश देवकुडे वय ६३ वर्षे,भोसलेनगर, सक्करदरा यांचे छत्रपती चौक येथे रंगोली कलेक्शन या नावाने कपड्यांचे होलसेल दुकान आहे.त्यांनी २०२२ मध्ये जेठानी दांपत्याला दुकान सांभाळण्यासाठी दिले होते.त्यांनी दिवाळीच्या कालावधीत विक्री केलेल्या कपड्यांचा हिशेब
देवकुडे यांना दिलाच नाही.त्यामुळे त्यांना संशय आला.ज्या दुकानदारांना कपडे विकले,त्यांची भेट घेऊन विचारपूस केली असता; पैसे कधीच दिले असल्याची बाब समोर आली.आरोपी दांपत्याने ५६ दुकानदारांना कपडे विकून रोख रक्कम घेतल्याचे व ती रक्कम स्वतःच्या खात्यात वळती केल्याची बाब स्पष्ट झाली.देवकुडे यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार केली.पोलिसांनी जेठानी दांपत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

