Thursday, August 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता विवाहासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा….

आता विवाहासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- उन्हाळ्यात सुट्ट्यांमुळे सर्वत्र लग्नसराईची धूम असते.मात्र,यंदा मोजक्या लग्नमुहूर्तामुळे लग्न जमलेल्या उपवर- वधूंची चांगलीच गोची झाली आहे. यंदा एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात लगबगीने विवाह पार पडले.तर मे महिन्यात हिंदू पंचांगानुसार १ व २ मे या दोन दिवशी लग्न मुहूर्त होते.आता एकदम दोन महिन्यानंतर तिथी आहेत.त्यामुळे मुहूर्त व तिथीनुसार लग्नबेडीत अडकणाऱ्यांना वाट पाहण्यावाचून पर्याय नाही.

३ मे ते ३१ मे या संपूर्ण महिन्यामध्ये गुरू व शुक्र दोघांचा लोप असल्याने या कालावधीत विवाह तिथी नाही.तर १ जून ते ११ जूनदरम्यान गुरू व शुक्र लोप तर १२ जुन ते २८ जुन दरम्यान शुक्र लोप असल्याने शुभविवाह सोहळ्यास तिथी नाहीत.आपल्या नियोजनानुसार व सोयीनुसार मे व जून महिन्यात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.तथापी दोन महिन्याच्या अवकाशानंतर एकदम जुलै महिन्यात विवाह मुहूर्त आहेत.परंतु, या कालावधीत दमदार पावसाला सुरूवात झालेली असते.यंदा पर्जन्यमान अधिक असल्याचा आधीच अंदाज वर्तविण्यात आला आहे.जुलै महिन्यात ९,११, १२,१३,१४,१५,१९,२१,२२, २३,२५, २६,२७,२८,३०, ३१ जुलै तर ऑगस्ट,सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पावसाळा आणि चातुर्मासात विवाह सोहळ्यास तिथी नसल्याने दीपावली तुळशी विवाहानंतरच लग्नाचा बार उडणार आहे.

मे व जुन सलग दोन महिन्यांत शुभविवाह सोहळ्यास तिथी नसल्याने विवाहोच्छुक वर व वधूंना दोन महिने वाट बघावी लागणार आहे.तथापी काहींना पुरोहितांचा सल्ला घेऊन शुभ दिवसाचा उतारा यावर शोधला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!