Friday, July 31, 2026
Homeदेसाईगंजस्वतः च्याच कर्मचाऱ्यांना जात-पात विचारणारा 'तो'  अधिकारी कोण?-'त्याच्या' मनात अजूनही जातीयवाद कायम…

स्वतः च्याच कर्मचाऱ्यांना जात-पात विचारणारा ‘तो’  अधिकारी कोण?-‘त्याच्या’ मनात अजूनही जातीयवाद कायम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- आजच्या आधुनिक तसेच तंत्रज्ञानाच्या युगात अनेकजण वरिष्ठांचा आदर करून आपापल्या परीने कार्य करीत आहेत.सर्वांसोबत मिळून-मिसळून राहून ‘एस सर हो सर’असे म्हणून स्वतःची बांधिलकी जोपासून मानाचा मुजरा करतांना सर्वत्र बरेचजण दिसून येत आहेत.अशातच एका विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यालयातीलच एका कर्मचाऱ्याला तुझी जात कोणती? व जातीचा प्रकार काय? अशी विचारणा करून त्याच्या कॅटेगरीत मोडणाऱ्यांना त्रास द्यायचे; नाही तर इतर जाती-पंथाचे कर्मचारी असणाऱ्यांना नाहक त्रास देऊन आपलाच बोलबाला ‘त्या’ अधिकाऱ्याने सुरू केला असल्याने एका तालुक्यातील कार्यालयात सदर घटने बाबत एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार,एका कार्यालयातील अधिकाऱ्यास जेमतेम बोटावर मोजण्याइतकेच दिवस वा महिने झाले असल्याचे कळते.मात्र सदर अधिकारी हा स्वतःच हुशारकी मारून आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करून तुझी जात कोणती? व तुझ्या जातीचा प्रकार काय?असे म्हणून पदाचा रोप झाडीत असल्याचा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.महत्वाचे म्हणजे जो कुणी वरिष्ठ अधिकारी असेल,अशांनी एखाद्या आपल्याच विभागातील कर्मचाऱ्यास जात-पात विषयी विचारणा करणे चुकीचे आहे.मुख्यत्वे एखादा कर्मचारी वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नसेल वा बरोबर काम करीत नसेल तर त्यावर तात्काळ कायदेशीर प्रक्रिया वा कार्यवाही करणे आवश्यक आहे.मात्र याठिकाणी वेगळीच परिस्थिती निदर्शनास आली आहे.सदर कार्यकर्ता एवढ्यावरच थांबलेला नसून एका तालुक्यातील रेती तस्करांना ‘मैं पाच हजार या दस हजार लेणे वाला इंसान नहीं बल्की दो लाख रुपये हर महिना देना पडेगा’ अशी बतावणी करीत असल्याची गुप्त माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.मात्र सदर कार्यकर्त्यास अजूनही कळलेले नाही की,एक अनोखा तालुका आहे; इथे ना जात-पात चालीत; नाही धर्म-पंथ,इथे केवळ चालतोय ती माणुसकी; माणुसकी पलीकडे कुणीही मोठा नाही; अन्यथा इथे होतेय उचल बांगडी…त्यामुळे अतिउताविळपणा करून चालणार नाही व तेही आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना सांभाळून नेणे ही तितकीच आपली वा वरिष्ठांची जबाबदारी म्हणावी लागेल; असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!