Sunday, September 20, 2026
Homeगडचिरोलीअवैध वाळू उपसा करणारी चार वाहने जप्त…-अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भरारी पथकाची...

अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने जप्त…-अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भरारी पथकाची कारवाई….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील गणपूर घाटावर अवैध वाळू उपसा करणारी चार वाहने काल जिल्हा भरारी पथकाने जप्त केली आहेत.अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांचे मार्गदर्शनात  जिल्हा खनिकर्म अधिकारी बर्डे,मंडळ अधिकारी नवनाथ अतकरे,तलाठी सुधीर बाविस्कर यांच्या पथकाने निवडणुकीच्या व्यस्त कामातही ही कारवाई केली.

जप्त करण्यात आलेल्या चारही वाहने ट्रॅक्टर असून चालक गणेश यशवंत वार,भारत राऊत,सुभाष मंढरे आणि सचिन राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.जिल्हयात मागील वित्तीय वर्षात १७२ वाहन जप्त करण्यात येवून त्यातील २४८ प्रकरणात २ कोटी ६१ लाख रुपये दंड आकारण्यात आला होता; त्यापैकी १ कोटी ३९ लक्ष रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.जिल्हयात इंदिरा घरकुल योजना,पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल  योजने अंतर्गंत दुर्बल घटकातील लोकांना मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामासाठी ५ ब्रास पर्यंत रेती विना मुल्य उपलब्ध करुन देणेसाठी जिल्हयातील आमगांव, (ता.चामोर्शी), थुटेबोडी व वैरागड (ता. आरमोरी),चोप (ता.देसाईगंज) नगरम-१ (ता. सिरोंचा) या रेती घाटांमधून रेती उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले होते.मात्र सदर घाटावरुन प्रत्यक्ष बांधकामाचे ठिकाणी रेती वाहतूक करणे खर्चीक ठरत असल्याने गावालगतच्या रेती उपलब्ध असलेल्या  नदी-नाल्यातून ५ ब्रास रेती उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.तहसिलदार व संवर्ग विकास अधिकारी,पंचायत समिती यांचे संयुक्त स्वाक्षरीने गावालगत उपलब्ध नदी-नाल्यांचे प्रस्ताव दिनांक-३० एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आज दिले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!